


निर्मितीमूल्य ,मागच्या काळातील कला दिग्दर्शन उत्तम. पोवाडा आणि बाकीची गाणी श्रवणीय आणि स्फूर्तीदायक ..एक थोडी खटकलेली गोष्ट म्हणजे आपल्याकडील चरित्रपट्आत नायकाला देवत्व बहाल करूनच पडद्यावर दाखवलं जात तसाच काही प्रमाणात इथेही झालं आहे ....त्यामुळे माणूस म्हणून टिळक जास्त समजत दिसत नाहीत ...खगोल तज्ञ,गणिती,जहालमतवादी आणि असे अनेक पैलू असलेल्या व्यक्तिमत्वाला अडीच तासात न्याय देणं खूप कठीण आहे पण ते दिग्दर्शक ओम राऊत ने पेललं आहे ...चरित्रपट हा documentry न होता एक उत्तम व्यावसायिक चित्रपट झाला तर त्यातून पोहोचणारा संदेश नक्की दूरगामी असतो हे ओम राउत ने जाणून आजच्या प्रेक्षकांना आवडेल भावेल असा एक्शनपट बनवला आहे.....
आणि हो ..नाना पाटेकरची Introduction आणि पडद्यावर तेव्हा दिसणारी चित्र निव्वळ सुंदर
एकूणच एक रोमांचक रंजक अनुभव
शेंगा टरफल गणेशोत्सव ई. च्या पलीकडे नेणारा हा चित्रपट नक्की बघा .....***१/२
No comments:
Post a Comment