Friday, 24 June 2016

हाईवे -एक सेल्फ़ी आर पार




हाईवे -एक सेल्फ़ी आर पार...नाव सार्थक करणारा मस्त चित्रपट ...थोड्या काव्यमय भाषेत सांगायच तर मानवी मनाचा कॅलिडोस्कोप....इतकी समांतर कथानक आणि इतके दिग्गज कलाकार (काही वाया घालवलेले) असूनही खुप सुसंगत ....बरीच कथानक ओळखु येण्या इतपत साधी आणि नेहमीची तरीही छोट्या छोट्या हावभावातून देह बोलीतून आणि सूंदर एक्सप्रेशन नी खुलवलेली......गिरीश कुलकर्णी निव्वळ अप्रतिम ...रेणुका शहाणे छोट्याश्या भूमिकेला पूर्ण न्याय देऊन जाते ...मुक्ता बर्वे ला फार वाव नाही पैन भूमिकेच बेअरिंग नेहमीप्रमाणे चोख ....सुनील बर्वे आणि त्याच्या बायकोच्या भूमिकेतली अभिनेत्री मस्तच ....त्यांचा गाण्याचा आणि a b c d म्हणायचा प्रसंग हिलारियस....
गिरीश कुलकर्णी आणि रेणुका शहाणे चिवड़ा खातानाच्या प्रसंगात गिरीश कुलकर्णी च्या चेहर्यावराचे क्षणार्धात बदलणारे हावभाव निव्वळ अप्रतिम ....टिस्का चोप्रा आपल्या स्माइल मधून योग्य ते convey करते ....हुमा कुरेशी नेहमीप्रमाणे छान
चित्रपटात कैरेक्टर्स ची गर्दी झाली आहे अस नक्की वाटत .एक दोन कथानक कमी करता आली असती ...मध्यांतरानंतर चित्रपट थोडा स्लो होतो पण जास्त लाम्बड़ न लावताच योग्य वेळी संपतोहि....कुठलहि कैरेक्टर caricaturish होउ न देण्याच् संपूर्ण श्रेय दिग्दर्शक उमेश कुलकर्णी च
नक्की बघावा असा हा आर पार जाणारा सेल्फ़ी
खुप दिवसांनी छान चित्रपट पाहिला.....




No comments:

Post a Comment