जागतिक स्तरावर नावाजलेले, वाखाणलेले आणि नंतर राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेले चित्रपट जेव्हा आपल्याकडे प्रदर्शित होतात तेव्हा थोडंस घाबरतच बघितले जातात. चित्रपट आवडला तर प्रश्नच नाही पण समजा नाहीच आवडला तर टीका टिप्पणी करणं कठीण ...एकतर आपल्याला चित्रपट कळला च नाही असं मत सहज होऊ शकतं कारण इतक्या दर्दी लोकांनी तो आधीच नावाजलेला असतो किंवा मुद्दाम प्रसिद्धी साठी प्रवाहा विरुध्द बोलत आहोत असाही म्हटलं जाऊ शकत ...कोर्ट चित्रपटानंतर हे प्रकर्षाने जाणवलं पण मी तो चित्रपट बघितला तेव्हा दोन्ही बाजूंनी भरपूर लिहून झालं होतं
सुदैवाने किल्ला ने निराशा नाही केली ...जेवढी पूर्वप्रसिद्धी आणि स्तुतीसुमने उधळली जात आहेत तेवढा पंचतारांकित चित्रपट नसला तरी छान नक्की आहे ...मुळात मनोरंजक आहे ....लहान मुलांची गोष्ट असल्याने fandry आणि एलिझाबेथ एकादशी शी तुलना अपरिहार्य आहे आणि तुलना केलीच तर माझ्यामते किल्ला ३ नंबर वर असेल .
कोकण /गुहागर चं अप्रतिम छायाचित्रण ,अर्चित देवधर चा चिन्मय काळे ,पार्थ भालेराव चा बंड्या ,खूप खूप कमी संवाद भाव खाऊन जातात .
एक खूप छान गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटात प्रचलित असलेली प्रेक्षकांना निर्बुद्ध समजून सगळ समजावून सांगायची प्रथा ह्याही चित्रपटात मोडली आहे ....खूप वेळ फक्त कॅमेरा बोलत असतो ...उगाचच अतिरंजित भावनांचा कल्लोळ नाही ...मस्त underplay ...अमृता सुभाष आणि अर्चित चा संयत अभिनय
अनेक कॅमेरा फ्रेम्स अप्रतिम आहेत ....चिन्मय किल्ल्यावर एकटा राहिल्यानंतर चा सीन ,तो समुद्र किनाऱ्यावर बसलेला सीन मला विशेष आवडले
अनेक कॅमेरा फ्रेम्स अप्रतिम आहेत ....चिन्मय किल्ल्यावर एकटा राहिल्यानंतर चा सीन ,तो समुद्र किनाऱ्यावर बसलेला सीन मला विशेष आवडले
नक्की बघावा असा किल्ला
No comments:
Post a Comment