अस्तु .... इंग्रजी मधे so be it किंवा मराठीत असो ...
अपघाताने निर्माते झालेल्या डॉ मोहन अगाशे अभिनीत अस्तु हा सुमित्रा भावे सुनील सुखठणकर दिग्दर्शित छान चित्रपट बघण्याचा आणि नंतर डॉ मोहन आगाशे ह्यांच्या शी संवाद साधण्याचा योग माझ्या मित्राने मिळवून दिलेल्या मिक्टा चित्रपट महोत्सवातिल तीकिटा मुले आला .... चित्रपट सुरेखच आहे ....एकाच आजाराकडे बघण्याचा कुटुम्बातील प्रत्येकाचा दृष्टिकोण असो की तथाकथित उच्च आणि सुशिक्षित लोक आणि अशिक्षित तरीही संवेदनशील अमृता ह्यांचा दृष्टिकोण असो दिग्दर्शक द्वयि ने अतिरंजकता टालून पण अतिशय समर्पक पण पोहोचवला आहे ....कुठेही बाजु न घेता आजाराशी संबंधित गोष्टी आणि मुद्दे मांडले आहेत ....शेवटी चित्रपट असल्याने काही गोष्टी फारच सोप्या वाटतात पण मुद्दा आणि objectives पूर्ण करण्यात 100% यशस्वी होतात......डॉ च्याच शब्दात सांगायच तर गोष्टी च्या पुस्तकात अभ्यासा च पुस्तक ठेउन प्रेक्षकाना सादर केल आहे ...... सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय हे आणखी विशेष ...इरावती हर्षे निव्वल अप्रतिम ....मिलिंद सोमण is a revealation....अमृता सुभाष आणि डॉ अगाशे तर लाजवाब
हा चित्रपट मुंबई त येइल की नाही माहित नाही पण जर आलाच तर चित्रपट गृहात जावून नाहीतर डीवीडी घेउन आवर्जुन बघा
ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मी संस्कृत जास्त न शिकल्याच परत थोड वाइट् वाटल
No comments:
Post a Comment