Friday 24 June 2016

जन्मरहस्य

जन्मरहस्य-डॉ. आनंद नाडकर्णी याचं लेखन म्हणजे नाटकात मनोरुग्ण किंवा मानसोपचार ह्यावर भाष्य असणार हे नक्की होतं पण ते ज्या अनुषंगाने नाटकात आलंय आणि ज्या पध्दतीने मांडण्यात आलंय त्यामुळे ते खूप रंजक झालंय आणि लेखकाला जे सांगायचंय ते स्पष्टपणे आणि ठळकपणे लोकांपर्यंत पोचलय ....महत्वाच म्हणजे नाटकाचा गाभा हा बाप-लेक ह्यांच्या नातेसंबंधांवर आधारित आहे पण नॉर्मल माणस आणि मनोरुग्ण ह्यांच्यातली रेषा किती सूक्ष्म असते किंवा ते फक्त जास्त वेळा पलीकडे जातात आणि आपण फक्त भोज्जा करून कदाचित परत येतो हाच काय तो फरक हे फार छान पुढे आलंय.....विचारांच्या interchangeability मुळे किंवा एकाच विचाराचा धागा नॉर्मल आणि मनोरुग्ण ह्यांच्या बाबतीत किती वेगळ्या पद्धतीने interpret केला जातो ते हि मस्त अन अचूक मांडलंय.....डॉ. च लेखन असल्याने संवाद चपखल आहेत आणि शास्त्रीय गोष्टी सोप्या सुलभ करून उलगडून दाखवल्या आहेत .....

अमिता खोपकर ने कमाल केली आहे ...खूप काम नसूनही जबरदस्त बेअरिंग आणि सॉलिड performance......hats off

इला भाटे ज्यांना आवडते त्यांना एक वेगळी modern आणि छान भूमिकेत बघितल्याचा आनंद मिळेल .भरपूर अभिनय करायच्या संधीच तिने सोन केलय ....

गेल्या पंधरा दिवसात आई-मुलगी आणि बाप-लेक अशा नातेसंबंधावर आधारित दोन वेगळी आणि अप्रतिम नाटकं बघायचा योग आला. मराठी रंगभूमी खूप चांगल्या phase मधून जात आहे .....आणि त्याहून ठळक पणे जाणवणारी गोष्ट म्हणजे दोन्ही नाटक स्त्री प्रधान आहेत आणि 50 प्लस अभिनेत्या ह्या मुख्य भूमिकेत आहेत .....त्यानी करियर बेस्ट performances दिले आहेत हेही महत्वाच ..... दर्जेदार कलाकृतींना लोकाश्रय कायम राहिलच

नक्की बघावं असं .......जन्मरहस्य

No comments:

Post a Comment