Friday, 24 June 2016

छापा-काटा

छापा-काटा- शेवट सोडल्यास दोन तासाचं अप्रतिम नाटक ! वेगळा विषय निवडण्यापासून ते सादरीकरण,संहिता संवाद आणि कलाकारांच्या निवडी पर्यंत सगळ्या गोष्टी निर्माती मुक्ता बर्वे ने पहिल्याच प्रयत्नात perfect साध्य केल्या आहेत .. आई-मुलगी ह्या विषयावर दोन तासाचं नाटक बेतायचं आणि त्यात कुठेही अवास्तव भडकपणा ,नाटकीपणा न आणताहि ते रंजकतेने सदर करायचं ह्यात लेखक निर्माती आणि दिग्दर्शक पूर्णतः यशस्वी झालेत . रीमा (लागू) ने स्वतःला कलाकार म्हणून नव्याने शोधलंय....शेवटपर्यंत भूमिकेचा बाज आपल्या हावभावातून आणि संवादातून कायम राखला आहे आणि मुक्त बर्वे ने अप्रतिम साथ केली आहे.....नक्की बघण्यासारखं नाटक ...मझा आ गया...

ह्या नाटकाच्या निमित्ताने दुपार च्या प्रयोगांना परत संजीवनी मिळाली आहे असं वाटतंय ...कदाचित रात्रीचे shows न मिळाल्याने हे अपरिहार्य असेल पण नाटकाला मिळणारा प्रतिसाद बघता चांगल्या प्रयोगाला प्रेक्षक नेहमीच उचलून धरतात हे परत सिद्ध होत ...मग वेळ prime time असो वा नसो

No comments:

Post a Comment