Friday 24 June 2016

कट्यार काळजात घुसली


कट्यार काळजात घुसली हा चित्रपट सुमारे ५० वर्षापूर्वीच्या गाजलेल्या नाटकावर “आधारित” आहे हे पक्कं लक्षात ठेऊनच बघायला जा म्हणजे सुबोध भावे ने दिग्दर्शनाच्या पदार्पणातच काय मास्टरपीस बनवलाय त्याचं निर्विवाद कौतुक करता येईल . जर नाटकाचं चित्र रुपांतर अशा नजरेतून बघितलं तर आपल्या मागच्या पिढीतल्या लोकांची थोडीबहुत निराशा नक्की होईल. मी सुबोध भावे नेच दिग्दर्शित केलेलं नाटक ज्यात राहुल देशपांडे खां साहेबांची भूमिका करायचा ते पाहिलं होतं आणि यु ट्यूब मुळे मूळ नाटक हि थोडंफार बघितलं होतं .त्या पार्श्वभूमीवर “आधारित” ला खूप महत्व आहे असं वाटलं.
मर्यादित जागे मुळे नाटकांवर येणारी बंधनं चित्रपटात संपूर्ण झुगारून एक भव्य दिव्य चित्रपट निर्माते दिग्दर्शक आपल्यासमोर ठेवतात .मूळ नाटकाची संहिता कायम ठेऊन, cinematic liberty चा पुरेपूर आणि यथायोग्य वापर करून अथ पासून इति पर्यंत दिग्दर्शकाची संपूर्ण पकड असलेला १६० मिनिटांचा आणि विसेक गाणी असूनही जराही कंटाळवाणा न होणारा असा सर्वांगसुंदर चित्रपट सुबोध भावे ने दिला आहे .
जे मला बालगंधर्व बघताना जाणवलं होतं तेच थोड्याफार फरकाने ह्यातही जाणवतं ते म्हणजे गाणी खूपच पटकन संपवली आहेत ....अर्थात थोड्या वेळात खूप काही सांगायचं असल्याने चित्रपट माध्यमाची hi मर्यादा आहे जी पूर्वीच्या नाटकांना नव्हती .

बालगंधर्व प्रमाणेच ह्याही चित्रपटातली नवीन गाणी हि अप्रतिम आहेत आणि जुन्या गाण्यांशी पूर्णपणे मिसळून आपलं वेगळेपण टिकवणारी आहेत ....शंकर एहसान लॉय चं कौतुक करावं तेव्हढ कमी आहे ....सूर निरागस हो आणि मन मंदिरात निव्वळ अप्रतिम...
चित्रपटाची उच्च निर्मितीमूल्य कपडे ,सेट्स,अलंकार ह्यातून ठळकपणे दिसतात आणि चित्रपटच visual अपील वाढवतात .
सर्वच कलाकारांनी मन लावून काम केली आहेत पण सचिन ला सचिन सारखं वागू न देता त्याचा खां साहेब करणं हे सर्वतोपरी सुबोध भावे चं कौशल्य
सुबोध भावे च्याच म्हणण्यानुसार आपल्या पूर्वजांनी किती छान काही निर्माण करून ठेवलय ते नवीन पिढीला दाखवण्याचा त्याचा एक प्रयत्न आहे . त्यात तो १०० % यशस्वी झालाय हे नक्की
संपूर्ण परिवारासोबत नक्की नक्की बघावा असा चित्रपट

No comments:

Post a Comment