Friday, 24 June 2016

बायोस्कोप

बायोस्कोप-- चार प्रथितयश बल्लवाचार्यांनी(शेफ) उत्तमोत्तम पदार्थ (choicest ingredients) वापरून बनवलेली डिश आहे जी सादर करण्या आधी भरपूर सजवली आहे आणि जिचं खूप सुंदर वर्णन सादर करताना केलं आहे. अशी डिश आपल्या समोर आली तर एकतर आपल्या अपेक्षा खूप वाढतात आणि सहसा पंचतारांकित उपहारगृहातील डिश चं जे होत तेच आपलंही डिश चाखताना होतं....मुळात डिश अजिबात वाईट नसते पण आपलं लक्ष आणि appreciation हे इतर आजूबाजूच्या गोष्टींवरच केंद्रित होतं...
मला चार पैकी "बैल " हि लघुकथा खूप आवडली आणि दिल-ए- नादान हि छान वाटली.
एक होता काऊ खूपच cliched' वाटली आणि दुर्दैवाने मित्रा जराही भावली नाही .संदीप खरे कवी म्हणून माझा खूप आवडता आहे पण अभिनेता म्हणून तो ह्या कथेत संपूर्णपणे ineffective आणि मिस cast वाटला ...
बायोस्कोप छे promos जवळजवळ वर्ष दीड वर्ष आधी चालू झाले होते.कदाचित तेव्हाच चित्रपट आला असता तर आणखी भावला असता....कारण मध्यंतरी च्या काळात हिंदीतही असंच एक उपक्रम झाला आणि समलिंगी संबंधानबद्दल बोल्ड भाष्य करणारा "margarita with a straw" हा चित्रपट पण येऊन गेला.
असं असूनही गुलझार च्या उर्दूमिश्रित निवेदनासाठी,कवितांसाठी, पार्श्व संगीत आणि गायनासाठी ,सर्व गुणी कलाकारांच्या उत्तम अभिनयासाठी आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे सुरवातीच्या कॅलिग्राफी साठी एकदा नक्की बघू शकाल असा .....बायोस्कोप


No comments:

Post a Comment