Saturday 7 September 2013

वाडा चिरेबंदी -मग्न तळ्याकाठी -युगांत

अखेर युगांत हि महेश एलकुंचवार यांची  नाट्यत्रयी वाचली ....खरतर पंधरा  वर्ष उशीरच झाला पण बेटर लेट देन नेवर ....१९९४ साली आठ-नऊ तासांच नाटक कारायचं धाडस चंकू, महेश एलकुंचवार आणि अरुण काकडे ह्यांनी दाखवलं त्याला मराठी रसिक प्रेक्षकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद पण दिला ...दुर्दैवाने मी ते बघू शकलो नाही पण पुस्तक वाचताना अक्षरशः प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात .एवढे तगडे आणि व्यस्त  कलाकार ..सगळ्यांना त्यांच्या वैशिष्ट आणि लकबी सहित इमाजीन करू शकलो .कदाचित त्यामुळे  पुस्तक जास्त आवडलं.वऱ्हाडी भाषेचा झणझणीत तडका , खेड आणि शहर , कटू वास्तव आणि खोटा बडेजाव ,मोडकळीस आलेली भारतीय कुटुंब व्यवस्था , सगळीच पात्र ना पूर्ण चांगली ना पूर्ण वाईट...विदारक परिस्थिती मुळे त्यांच्यात होणारी स्थित्यंतरं... सरकारी अनास्था ई.ई...सगळच खूप छान व्यक्त होतं.
वाडा चिरेबंदी -मग्न तळ्याकाठी  आणि युगांत  तिन्हीचे काळ विषय प्रसंग म्हटले तर वेगळे आणि म्हंटल तर एकमेकात गुंतलेले ....
मायबाप गुगल वर शोध घेताना ह्या नाटकाचा यू ट्यूब वर व्हिडीओ मिळाला पण दुर्दैवाने ते नाटक नवीन संचातील आहे.
सुलभा देशपांडे आई म्हणून , वंदना गुप्ते वाहिनी म्हणून , सौमित्र रांगडा  पराग म्हणून अतिशा नाईक रंजू म्हणून , सचिन खेडेकर  अभय म्हणून किती चपखल बसतात ...मजा आली असती नाटक बघताना

ह्या नाट्यत्रयी मधला शेवटचा अध्याय म्हणजे युगांत symbolic  आहेच पण थोडा निराशावादी आणि फिलोसोफिकॅल  पण आहे कदाचित म्हणूनच तो बऱ्याच लोकांना आवडला नसेल...मला मग्न तळ्याकाठी सगळ्यात जास्त आवडलं...
सुबक च्या सुनील बर्वे ला नम्र विनंती कि ह्या कलाकृती च पुनरुज्जीवन करावं...
मराठी प्रेक्षक नक्की प्रतिसाद देईल ....हे कठीण आहे पण अशक्य नाही....

22 March 2015

काल नवीन संचातल "वाडा चिरेबंदी" गडकरी ला बघितलं ..... अजूनही hangover आहे ...विसेक वर्षापूर्वी चंकू ने महेश एलकुंचवार यांच्या कथेवर आधारित ८ तासांची trinatyadhara केली होती त्यातल्या पहिल्या नाटकाचं हे नवीन संचातल पुनर्सादरीकरण आहे ...वऱ्हाडी भाषेचा झणझणीत तडका , खेड आणि शहर , कटू वास्तव आणि खोटा बडेजाव ,मोडकळीस आलेली भारतीय कुटुंब व्यवस्था , सगळीच पात्र ना पूर्ण चांगली ना पूर्ण वाईट...विदारक परिस्थिती मुळे त्यांच्यात होणारी स्थित्यंतरं... सगळंच भेदक आहे ...निवेदिता जोशी ची वाहिनी अप्रतिम .वैदर्भीय भाषेचा लहेजा जपण्यातल सातत्य वाखाणण्याजोग आहे ...वंदना गुप्ते ची सर नसली तरीही नक्की लक्षात राहण्याजोगी ...प्रसाद ओक चा सुधीर मस्त ...वैभव मांगले ,नेहा जोशी ,प्रतिमा जोशी यथायोग्य ...
चंकू ने आशय तसाच ठेऊन आजच्या वेळेच्या मर्यादेत उत्तम नाटक बसवलंय ...आनंद मोडक याचं संगीत समर्पक आणि गहिर...
नाटकाला मिळणारा प्रतिसाद बघून वाटलं कि कदाचित आजही ८ तास लोकं बसले असते
नक्की hi अभिजात कलाकृती बघा ...गंभीर बाज असला तरी कुठेही कंटाळवाण होत नाही इतके दमदार प्रसंग आहेत ....पण गंभीर नाटक आहे हे लक्षात ठेऊन गेलं तर जास्त छान वाटेल हे नक्की

No comments:

Post a Comment