Sunday 4 November 2012

एका क्षणात ....दीर्घकाळ मनात रेंगाळणारं नाटक



शरद पोंक्षे म्हटल कि " मी नथुराम गोडसे बोलतोय", "लहानपण देगा देवा" इत्यादी नाटक असो  किवा "उंच माझा झोका" हि सध्याची लाडकी मालिका असो...एक संवेदनशील,passionate  आणि तडफदार व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं . त्याच्या  " मी नथुराम गोडसे बोलतोय" मधल्या गाजलेल्या आणि धाडसी भुमिके पासून तो मला अभिनेता म्हणून आवडतो .  "लहानपण देगा देवा" मधल्या त्याच्या पल्लेदार संवाद फेकीने आणि  तरल प्रसंगातल्या अभिनयाने मी फारच प्रभावित झालो होतो.एक सामाजिक बांधिलकी असलेला आणि आपली भूमिका जनतेत आणि प्रसार माध्यमातून स्पष्टपणे  मांडणारा ( मग ती भूमिका राजकीय दृष्ट्या सर्वाना आवडणारी असो व नसो) असा एक अभिनेता नाटक दिग्दर्शित करतोय म्हटल्यावर माझी उत्सुकता बऱ्यापैकी ताणली होती आणि लवकरात लवकर हे नाटक बघायच हे ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ठाण्याच्या Dr . काशिनाथ घाणेकर या अद्ययावत  नाट्यगृहात  एका क्षणात .... बघण्याचा  योग जुळून आला.

नाटका  बद्दल काहीच माहित नसताना म्हणजे विषय काय,विनोदी कि गंभीर इत्यादी ..नाटकाला जाण ह्यात एक वेगळीच मजा आहे पाटी  पूर्ण कोरी असते आणि  समोर जे घडणार असत ते तुम्ही मोकळ्या मनाने (with open mind n without prejudices ) स्वीकारायला तयार असता .. अर्थातच ह्यात एक मोठी रिस्क हि असते कि तुमचे २०० रुपये  आणि वेळ वाया जाऊ शकतो...  असं होणार नाही अशी अशा मी करत होतो ...

नाटकाचा पडदा उघडल्या उघडल्या नेपथ्य तुमच लक्ष वेधून घेतं ...vibrant रंगसंगती, polished  घर, मोजकच पण  दर्जेदार furniture  बघून छान वाटतं ... आजकाल नाटकात common असलेली आणि योग्य  उपयोग होणारी  मोठी प्रोजेक्टर स्क्रीन हि दिसते...

सुरुवातीच्या १५-२० मिनिटात नाटकाच्या विषयाचा व्यवस्थित अंदाज येतो  पण सदरीकारणातल्या नाट्यमय ते मुळे आपला इंटरेस्ट  जराही कमी होत नाही....पुढे काय होणार किंवा  कथानक काय आहे ह्याचा आपण अंदाज बांधत असतो आणि तो बरोबर आहे अस वाटत असतानाच काही नाट्यमय घटनांमुळे आपला अंदाज चुकणार कि काय असंहि  वाटतं हेच ह्या नाटकाचं , लेखकाचं आणि दिग्दर्शकाचं यश आहे.....

नाटकात खूप नाट्य आहे  पण ते भडक होत नाही ... शरद पोंक्षे च्या स्वभावविशेशानुरूप  आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाद्दलचा दृष्टीकोण ,एकूणच बधीर समाज ह्यावरही योग्य टिप्पणी  आहे पण त्याचाही अतिरेक नाही ...संहीतेचा एक भाग म्हणूनच ती गोष्ट उर्धृत होते आणि तरीही अपेक्षित परिणाम करून जाते .....

दिग्दर्शक शरद पोंक्षे ला लेखक संदीप जंगम ने सुरेख साथ दिली आहे ...

पण ह्या नाटकाचा खरा हिरो आहे अभिनेत्री अश्विनी एकबोटे ....काय अप्रतिम काम केलं  आहे तिने..जवळजवळ सर्व वेळ ती रंगमंचावर असते , सर्व नाट्यमय प्रसंगात तीव्रतेच्या भावना दाखवण्याच उत्तम कसब तिने आत्मसात केलं  आहे आणि ते अतिरंजित वाटणार नाही इतका प्रामाणिक अभिनय केला आहे..दोन अडीच तासात इतक्या wide  ranging भावना प्रदर्शन करणं  हे मानसिक आणि शारीरिक दमवणूक करणार आहे पण हे आव्हान तिने अतिशय समर्थपणे पेललं आहे.....

शरद पोंक्षे ने तिला तेवढीच समर्थपणे साथ दिली आहे ... स्वतः  दिग्दर्शक असूनही कुठेही वरचढ भूमिका किवा कुरघोडी करायचा प्रयत्नही केलेला नाही हे दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून कौतुकास्पद आहे ...

मानसोपचार तज्ञ  म्हणून काम करणारा सचिन देशपांडे खूप confident  आहे  आणि मोकळेपणे रंगमंचावर वावरतो पण त्याच्या भूमिकेचं caricature  झालंय  असं  वाटतं ...त्याचा वापर रंगमंचावरील tension  दूर करून थोडा comic relief  देण्यासाठी झालाय ते थोड खटकतं ...

"सहन करायचं  पण त्रास होऊ द्यायचा नाही" ह्या रूढ होत चाललेल्या वृत्ती बद्दल नाटकातले संदर्भ लावून एकूण समाजावर केलेली टिप्पणी हि छान  आहे... ह्या प्रसंगातला अश्विनी एकबोटे चा अभिनयही लाजवाब ....

ह्या व अशा बर्याच नाट्यमय प्रसंगासाठी आणि अश्विनी आणि शरद पोंक्षे च्या अभिनय साठी हे नाटक नक्की बघायला हवं ...

खूप दिवसांनी एक गंभीर पण छान  नाटक बघायला मिळालं ...

No comments:

Post a Comment