तुम्हाला आंबा कसा खायला आवडतो?आज ह्या मोसमातला शेवटचा हापूस आंबा खाताना लोकांना आंबा कसा खायला आवडत असेल याचा उगाचच विचार करत होतो।
मला स्वतःला आंब्याची साल काढून संपूर्ण आंबा हातात घेऊन त्याचे मस्त लचके तोडत खायला आवडत .अर्थात ह्यात थोडी भीती असते कि आत कोयीला लागला असेल तर ?अन्यथा ह्यासारखी मजा नाही.सगळा गर खाऊन झाला कि कोय दातावर घासून इतकी पंढरी करायची कि लगेच चुलीत टाकली तरी जळेल.
नंतर मग दाताच्या फटींमधून आंब्याचे केस काढत राहायच. हात कितीही धुतले तरी न जाणारा पिवळेपणा किवा नखांच्या बाजूचा पिवळेपणा आपण लुटलेल्या आनंदाची साक्ष देत असतो.लहानपणी तर मे महिन्याच्या सुट्टीत दुपारी सगळे खेळायला जमले कि सहजच बोट बघितली जायची ,कोण आंबे खून आलेत हे पाहण्यासाठी।
बर्याच वेळाने येणारी आंब्याची मस्त ढेकर हाही आंबे खाण्याच्या सगळ्या process चा अविभाज्य घटक आहे ...खरतर ढेकर म्हटलं कि छान अस काही मनात येत नाही पण आंब्याची ढेकर पण special असते असा मला वाटतं .
जी लोकं हापूस आंब्याचं milkshake ,आमरस ,icecream साखर वगैरे घालून आवडीने खातात त्यांचं मला थोडा आश्चर्य वाटतं .मलाही ह्या गोष्टी आवडत नाहीत असं नाही पण ती हापूस बरोबर केलेली तडजोड किवा हापूस चा अपमान वाटतो।
हे झाल हापूस बद्दल, पण जर पाडाचे किवा पायरी आंबे असतील तर ते पिळून, चोखून खाण्यातच खरी मजा.बाकी गेलाबाजार दशहरा , बदामी,लंगडा इत्यादी बद्दल लिहिण्यासारखं फार नाही।
आता पुढचा मोसम येईपर्यंत फारच आठवण झाली जिभेला आणि ह्या राजाचा रस काढून जर फ्रीझर मध्ये ठेवला असेल तर ताज्या आंब्याची चव आठवून तडजोड म्हणून आस्वाद घ्या.

mango days are back again !! :) sorry i do not understand Marathi that well but i know Hapus is a mango breed and i love all types of mangoes hence could not stop commenting on the post :)
ReplyDelete