माझ्या इंग्रजी मधल्या ब्लॉग चा शशांक गोरे ह्या मित्राने केलेला स्वैर अनुवाद
जगदीशने ज्या वेळेपासून त्याच्या पायलट ट्रेक २ भीमाची काठी, प्रतापगड via कुडपण बद्दल लिहिलं .... त्या वेळेपासून माझ्या मनाने ठरवलं कि हा ट्रेक करायचाच.. आणि कारणे हि बरीच होती ... एक ... हा ट्रेक कधीही न ऐकलेला म्हणजे माणसांची गर्दी नसणार जी आज आपल्याला सगळीकडे पावसाळ्यामध्ये आढळते....
दोन ... ते म्हणजे मला माझ्या आधीच्या ट्रेकमधले मित्र-मैत्रिणी, (शिखरवेध बरोबर ट्रेक केलेले)https://www.facebook.com/
दोन ... ते म्हणजे मला माझ्या आधीच्या ट्रेकमधले मित्र-मैत्रिणी, (शिखरवेध बरोबर ट्रेक केलेले)https://www.facebook.com/
आणि अजून एक वजनदार कारण होतं ते म्हणजे ट्रेकचे लोकेशन ... जे महाबळेश्वरजवळ होतं आणि माझ्या माहितीनुसार, त्या परिसरात पडणारा धो-धो पाऊस (जो मुंबई आणि उरलेल्या महाराष्ट्रामध्ये पडत नाही).
मी ठरवले कि वाशीवरून बस पकडायची ... कारण माझ्यासाठी ठाणे - वाशी हा सोपा पर्याय होता. मध्य रेल्वे वेळापत्रकानुसार वाशीला जाणारी रेल्वे ११:१० वाजता येणं अपेक्षित होतं पण मी जेव्हा पोचलो तेव्हा बघितलं तेथे दोन रेल्वे होत्या ... १. बेलापूरला जाणारी (११:१९ ची) आणि शेवटची वाशीला जाणारी (११:४५ ची) .. मध्य रेल्वे वर विश्वास ठेवून ... आणि माझ्याकडे वेळहि होता, बेलापूरला जाणारी गाडी पकडली ... आणि जुईनगरला उतरलो ... ते मनामध्ये ठरवून वाशी गाडी पकडायची. नेहमी प्रमाणे २०-२५ मिनिटे गाडी नाही ... म्हणून जुईनगर हायवेला येऊन आमची बस पकडायचे ठरवले. अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे बऱ्याच मुली किंवा बायका (लग्न न झालेल्या म्हणायचं आहे मला) त्या वेळेला स्टेशनवर होत्या ... बघून बरं वाटलं कि आपण अजून किती सेफ आहोत बाहेरच्या मेट्रोपेक्षा ... प्रामुख्याने दिल्लीपेक्षा ... आणि आवडलं कि माझी लाडकी मुंबई अजून त्या वाटेवर गेली नाही आहे अर्थात जाणार हि नाही ...
जगदीशला फार काय त्रास झाला नाही माझ्या सारख्याला शोधायला, जो ३/४ मध्ये पुलाखाली हायवेवर वाट बघत उभा होता. लगेचच मी बस मध्ये चढलो .... स्वागत पार पडले ओळखीच्या मित्रांकडून ... त्याबरोबर अजून एक प्रश्न माझं स्वागत करत होता, तो म्हणजे "अमित goggle कुठे आहे ?" (प्रश्नामागचे कारण होते ... रतनगड, संधन ट्रेक मध्ये झालेला एक मजेशीर प्रकार) .. मला थोडा वेळ लागला समजायला पण नंतर कळले कि आपल्या पूर्वीच्या ट्रेक मधले मजेशीर अनुभव आठवून सगळेच असे काही प्रश्न विचारत होते. पहिल्या पाच - दहा मिनिटे हे चालू होते ... व नीट सगळे पार हि पडले .. सगळे आपल्या दिलेल्या जागेवर स्थिरावले ... आणि मी सुद्धा त्या मधला एक हिस्सा झालो. बरेच ओळखीचे चेहरे होते ...
शशांक, प्राजक्त, मेघा, विशाल, वीणा, महेश, प्रिन्स, सुप्रिया, श्रद्धा, चेतन, पूनम, भास्कर आणि अर्थात जगदीश (जो इकडे तिकडे फिरत होता) ... या मधले बहुतेक जण माझ्या पूर्वीच्या ट्रेक मधले होते आणि काही फेसबुक वरून ओळखीचे ... मला घरी असल्या सारखंच वाटलं.
१२ वाजून गेले होते आणि पुढे असलेला पूर्ण दिवसाचा ट्रेक, तरीही कोणी झोपण्याच्या किंवा विश्रांतीच्या मूडमध्ये नव्हते. त्याला काही अपवाद होते (एक म्हणजे निलेश तावडे ... जो आमच्या सगळ्यांच्या वाट्याची झोप घेत होता ... हा पठ्ठा लगेचच झोपला ... मोठ्ठा आवाज, गोंधळ, शिट्ट्या आणि ओरडणे ... याची कोणतीही परवा न करता ... :)
गाण्यांच्या भेंड्या चालू झाल्या. आमच्यातले बरेच बाथरूम सिंगर होते (माझ्याप्रमाणे), पण बरेच खरोखर गाणारेही होते. आमच्यातल्या काही उत्साही मित्रांनी बोंगो आणि डफ आणले होते, त्यामुळे आणखीनच मजा आली. वाजवनार्यांच विशेष कौतुक ह्यासाठी कि आम्ही कितीही बेसूर गायलो तरी ते सुरात साथ देत होते, कुठूनही rhythm सोडत नव्हते. आमच्या पार्टीतल्या दीपक ची इतकी गाणी पाठ होती कि पठ्ठा सगळे थांबले कि पुढच कडवं सुरु करायचा. मित्रांकडून गाण्यांवर येण्याऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया, होणारे कौतुक भन्नाट होतं. गाण्यांमधली विविधता अफाट होती ... मराठी, हिंदी, जुनी आणि नवीन गाणी, remix ... आम्ही सर्व गायलो ... पण सर्वांचा कल उत्स्फूर्तपणे जुन्या गाण्यांवर होता ... हे सगळे चालू होते पहाटे ३ पर्यंत ... आमच्यातले फार थोडेच झोपू शकले ह्या गोंधळामध्ये ....
आम्ही ठरवलेली वेळ होती साधारण सकाळी ५ वाजता (१८६ किलोमीटर दादरहून) .. पण आम्ही लेट होतो (बसमध्ये असलेल्या बिघाडामुळे, बसला घाट पार करताना होणारा त्रास). त्यांनी थोडा प्रयत्न केला पोलादपूरला दुरुस्त करण्याचा कारण पुढे रस्ता उतरणी-चढणीचा आणि छोटा होता. आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून डाव्या हाताचा रोड घेतला, जो प्रतापगडाला जातो. एक ५ किलोमीटर नंतर उजव्या हाताला एक रोड जातो, तो नंतर पुढे कुडपण (कुर्द आणि बुद्रुक) आणि शेवटी क्षेत्रफळला जातो. बसने आत्मविश्वासाने पुढचा प्रवास चालू केला पण तो काही काळापर्यंतचाच ठरला. एक १० किलोमीटर नंतर बसने सांगून टाकलं कि अजून पुढे जाता येणार नाही. आम्ही बसमधून उतरलो आणि आजूबाजूच्या हिरवळीमध्ये एकरूप झालो. इतकं मस्त वातावरण होत ... सकाळीची शुद्ध हवा, पक्षांची किलबिल, ओढ्याचा खळाळता आवाज, मजेत चरणाऱ्या गाई, म्हशी अन शेळ्या व गुराखी ... क्षणभर सगळेजण विसरलो कि बस बंद पडली आहे आणि कुडपण गाव अजून १०-१२ किलोमीटर लांब आहे. जगदीशच तो, त्याने सकाळच्या न्याहारीसाठी आणलेले डोसे त्याच्या त्या अफलातून स्याक्मधून काढले ... वेळ वाचवण्यासाठी आणि आम्हाला गुंतवून ठेवण्यासाठी. आम्हाला ते नवीन होते आणि बरेचजण भुकेलेहि होते ... आमच्यातल्या काहींनी सकाळची तोंड धुणे ई .ई. कामे उरकली ... तर काहींनी (आळशीच ते) लगेचच डोस्यांवर ताव मारायला सुरवात केली नेहमीप्रमाणे. काही जणांनी सकाळचं दुसरं "महत्वाचं" काम पण उरकून घेतलं ... Truly one With Nature .... हाहाहाहाः
तेवढ्यात एका झाडावर एक मोठा पक्षी बसलेला दिसला आणि आमच्यातले "सलीम अली" भराभर नाव सांगायला लागले. अगदी घार, घुबड, गरुड, गिधाड ई .ई. त्यादरम्यान जगदीशने १०-१२ जणांना छोट्या Qualis गाडीतून ने-आण करायला सुरवात केली. उरलो आम्ही १६-१७ जण, आम्ही क्षेत्रफळ ते पोलादपूर बस पकडली. आम्ही २ तास ठरवलेल्या वेळेपेक्षा मागे होतो ... आम्ही जिथून सुरवात करणार होतो ते कुडपण गाव .. इतकं प्रसन्न होतं ... थंड आणि मस्त .... प्रत्यक्ष तुम्ही ढगांमध्ये होतात. आमच्या मधले सगळे लगेचच तयार झाले पुढच्या ट्रेकसाठी, रात्रीच्या प्रवासाचा शीण दूर करून..... एक साधारण किलोमीटर डांबरी रोड वरून गेल्यावर आम्हाला भीमाची काठी दिसली आणि एक मोठाला धबधबा दिसला (जोग falls पेक्षा हि मोठा) ... हे जे मी बघत होतो ते शब्दांच्या पलीकडले होतं .... पाणी ज्या प्रकारे पडत होतं ... एका दगडावरून आदळून थोडं खाली येत होतं ... असं वाटत होतं कि ते हळुवारपणे खाली येत आहे ... तो धबधबा जादुई आणि सुसाट होता ... अफलातून .... A perfect spot for photo session .... सगळेच जोमात होते फोटो काढण्यात ... ह्या लिंक्स वर पहा .... https://www.facebook.com/
आणि https://www.facebook.com/
photo.php?v=4039068268915
आम्हाला तिथून निघणे भाग होते कारण पुढे कुडपण खुर्द ला पोचायचे होते .... तिथे एका चांगल्या घरात आम्हाला चहा दिला .... आणि तिथूनच आमचा खरा ट्रेक चालू होणार होता. त्यानंतर एक ४५ मिनिटाचा मार्ग चढणीचा होता आणि जंगलातून जाणारा होता .... तो पार केल्यावर आम्ही सपाट पठारावर पोचणार होतो .... आम्ही खूप भाग्यवान होतो ... पाउस बऱ्यापैकी होता, त्यामुळे आम्हाला चढताना त्रास जाणवला नाही .... पण त्याचबरोबर आम्हाला कॅमेरे आमच्या rucksack मध्ये ठेवणे भाग होते ... जंगलातून पठारापर्यंतचा मार्ग अफलातून होता ... प्रचंड हिरवं-गार, जणू हिरवे गालिचे पसरले असावेत. ते दृश्य मनाला सुखावणारे होते ... ज्यांच्याकडे छोटे कॅमेरे होते त्यांनी लगेचच ते capture करायला सुरवात केली .... "सागर दळवी" ज्याने पायलट ट्रेक केला होता जगदीश बरोबर तो आमच्या बरोबर आघाडीला होता मार्ग दाखवण्यासाठी ... आम्ही बरेच वेळा त्याला खूप हैराण केले, सतत मार्ग विचारून, पण तो बिचारा एकच सांगत होता ... "मी लीड करत नाही आहे .. फक्त तुम्हाला मार्ग दाखवायचे काम करत आहे" अर्थात त्यानेही हे सगळे गमतीनेच घेतलं व हे नीट निभावून नेलं, कारण जंगलातून जाणारा मार्ग लक्षात ठेवणे खूप कठीण होतं, जरी तुम्ही आधी येऊन गेला असलात तरीही .... वेल डन ...
शेवटचा १ - १/२ तासाचा मार्ग तसा दमछाक करणारा होता, पण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता वर चालून जायचा ... जंगलामधून जाणारा मार्ग इतका लक्षात ठेवता येण्यासारखा होता कि तुम्हाला वर जाण्याऱ्या पाण्याच्या pipe लाच follow करायचे होते ... थोडं वर गेल्यावर आम्हाला दूसरा मार्ग घ्यावा लागणार होता कारण अफझल खानच्या कबरी जवळ असलेला police बंदोबस्त ... आपल्याला माहित आहेच का ते ....
शेवटी ४ - ४/५ तासांच्या ट्रेक नंतर आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी होतो आणि लगेचच आम्ही तिथे असलेल्या २ उपाहारगृहांमध्ये गेलो ... जरी त्यांच्याकडे पाव-भाजी, मिसळ व झुणका-भाकरी होती तरीही ... आमच्यातल्या काहींना वर असलेल्या सुविधांचा अंदाज होता व त्यांनी एक १५ मिनिटाचा walk / climb करून पूर्ण थाळी खाण्यात धन्यता मानली ... आम्ही मात्र दोन्हींना समान संधी दिली आणि जे त्यावेळेला असेल ते पोटामध्ये ढकलले .... प्रतापगड पूर्णपणे धुक्यामध्ये होता, बरोबर प्रचंड वाऱ्याबरोबर पडणारा पाऊस ..... आमच्या पोट्पुजेनंतर आम्ही गड explore करायला सुरवात केली. दाट धुक्यामुळे व ढगांमुळे आम्हाला टेहळणी बुरुज, तटबंदी इ.इ. दिसणं अशक्य होतं आणि आम्हाला प्रसिद्ध असे भवानी मातेचे मंदिर आणि जादुई असा शिवाजी महाराजांचा पुतळाहि बघायचा होता ... प्रामुख्याने, हा परिसर प्रचंड clean होता आणि नीटनेटका होता ... आम्हाला असं वाटून गेलं कि आम्ही पावसाळ्यानंतर इथे पुन्हा आलो पाहिजे ... (sort ऑफ bike trip)
गडावर ३ पाण्याचे स्त्रोत आहेत ... आमच्या सुदैवाने आमच्याबरोबर इतिहासकार आणि शिवचरित्रा मध्ये expert असा - "महेश गवसणे" होता .... मला त्याने आठवण करून दिली त्याच्या अश्याच एका session ची, जो त्याने कलावंतीण ट्रेक ला घेतला होता ... त्याने एक परीक्षावजा session घेतला होतं महाराजांवर ... आणि आम्ही तो पार पडला होता ... आम्ही ह्याही वेळेला त्याला request केली आणि त्याला सांगितलं कि पुन्हा हा सर्व इतिहास आमच्या समोर जिवंत कर ... गडावर असलेला कमी प्रेषकवर्ग, त्यामुळे त्याने ठरवलं कि नंतर बसमध्ये perform करायचं ... आणि घडलही तसेच ... त्याने पुन्हा सर्व तो इतिहास आमच्या समोर सादर केला ... हा पठ्ठा ह्या बाबतीमध्ये खूपच मन लावून आणि प्रचंड वाचन ठेवणारा आहे ....
प्रत्येक ट्रेक वर त्याचा जो effort आहे, (समोरच्यांना इतिहास थोडक्यात, पण समजेल असा, किल्ला म्हणजे काय इ.इ.) वाखाण्यान्जोगा आहे ... फक्त निसर्गाच्या सानिध्ध्यात गड चढणे ह्यापेक्षा ३००-वर्षापूर्वी तिथे वावरलेल्या महान लोकांबद्दल थोडं जाणून घेतलं तर सगळा अनुभव अधिक प्रगल्भ होईल. त्यावेळचं स्थापत्य शास्त्र किती आधुनिक होत, गड बांधण्यामागची संकल्पना, सुरक्षिततेची काळजी, पाणी, रसद इत्यादि गोष्टींचा किती सखोल विचार केला गेला होता हे जाणून घेता आलं तर त्या लोकांबद्दलचा आदर द्विगुणित होईल. Thanks a lot २ Mahesh for your brief history session.
परतीचा प्रवास तसा eventful नव्हता कारण प्रत्येकजण थकलेला आणि झोपलेला होता ... बसमध्ये असलेला प्रोब्लेम अजून पूर्णपणे सुटलेला नव्हता पण सुदैवाने मोठाहि नव्हता ... आणि आम्ही लेट झालो तरीही सुखरूप पोचलो, उशिरा रात्री किंवा भल्या पहाटे (काही जणांसाठी ... , एक तर दुधवाल्या बरोबर घरी पोचला) हाहाहाहः
आमच्या मधले बरेच जण सोमवारी कामावर होते ... like true trekkers .... लिखित rule ऑफ trekking च आहे तो "काहीही झालं तरी रविवारच्या ट्रेक नंतर सोमवारी कामावर जायचंच"
सर्वात महत्वाचा पार्ट ह्या सुखरूप पार पडलेल्या ट्रेक मधला ... आमचे ट्रेक मधील साथीदार / मित्र .... ज्यांच्या अभावी कुठलाच ट्रेक हा आनंदायी झाला नसता ...
Here is brief intro of my trek mates who made this wonderful and memorable....I must apologize in advance if I have missed out anyone...Its difficult to remember 40 names ...
First and foremost the beautiful single Ladies( those yet "SINGLE' and some who came alone)
Supriya---- Ever smiling and very helpful....old timer with SV..She finally managed to complete the song "उदे ग अंबे उदे " this time ..Knows many songs by heart especially both versions of Jay Jay Maharashtra maza and Breathless...Gr8 company
Veena---Disarmingly charming, photogenic, fun loving..regular with SV
Shraddha--Termed this trek as Reunion....Saw her after a long time....Very Good photographer,again Regular with SV
Pallavi--A dombivlikar, met her first time,very good in Antakshari. Made sure that we had a song ready each time..Was very cool even when we reached past midnight..
Poonam---Enthusiastic trekker, done few treks with her, good company
Megha--Very witty with good sense of humor...मुलांची खेचण्यात expert ....
Sonya--Very good फोटोग्राफर
There were three couples...
Avinash-Samidha,
Deepak and his wife Sheetal and
I think Rahul and his better half , Linanjali ....The best thing was they mingled with all ...
While chatting with Samidha, both of us realized that we lived very close to each other in Dombivli for many years and in Thane also ...but met only on treks...
Shashank and Prajakt---Its like mandatory for them to trek ...They are not allowed to be at home on weekends...
Prince Deepak, Vishal and Naresh from the SV team---Very helpful and enjoyable company...this time they were also like us newcomers as it was first time for them...Have enjoyed some very good treks with them
Mahesh Gavasne--Extremely passionate about Shivaji Maharaj, very funny
Nilesh Tawde--A man with Rs.13000 shoes, ever smiling affable personality
Sagar Dalvi--ह्या ट्रेक चा आमचा वाटाड्या ,easy going..
Mrugesh and Chetan-- Again regular trekkers, Chetan had this very innovative plastic cover with lids on his Camera enabling him to take photos even during rains...Real enthu photographer
Madhukar Dhuri-- YHAI Malad , very good photographer and trekker
Bhaskar Vats--Met him at Harihar trek...helped a first timer to get down safely there..rarely shows any emotions but helpful
There was a group of doctors whom I met first time...They were having fun and enjoying ...
Then there was Prashant Salunke, Sankalp Shrivastav, Jayesh Chowgule, Kiran Darekar
How can I not mention the Bongo player , You made the Antakshari very very musical and tirelessly played the instrument for almost 3 hours.
Last but not the least --Jagdish Patil
Very very cool Leader..Never shows anxiety...Never seen him shouting or getting angry with others and still manages to conduct the treks successfully. So many people keep on giving him suggestions including me, but this guy knows very wel what he is doing..Manages big groups very easily..During the trek he is everywhere, at the lead showing the way, helping all when needed, at the back till the last person is through the difficult patch...Great organisational Skills....
So, one more memorable trek completed with a promise to meet again and enjoy trekking...Cheers
Thanks , शशांक